नवीन वर्षात सातारा-देवळाईला पाणी देण्याचे नियोजन

Foto
१४ जलकुंभांच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण; पाणीपुरवठ्याला गती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत सातारा-देवळाईसह अद्याप पाणीपुरवठा सुरू न झालेल्या 'नो-नेटवर्क' भागाला नवीन वर्षात पाणी देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी १४ जलकुंभांच्या वितरण वाहिन्यांतील गॅप आणि संभाव्य गळतीचे सर्वे क्षण करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर वाहिन्यांमधून पाणी सोडून तपासणी केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने नळजोडण्या देण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून वितरण सुरू करण्यासाठी १४ जलकुंभांचे नियोजन करण्यात आले आहे. या जलकुंभांशी संबंधित वितरण वाहिन्यांचे सर्वेक्षण प्रथम केले जाणार आहे.
वाहिन्यांमध्ये काही ठिकाणी गॅप राहिले आहेत का, तसेच पाणी सोडल्यानंतर गळती होण्याची शक्यता आहे का, याची तपासणी केली जाईल.
त्यानुसार आवश्यक दुरुस्ती करूनच पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. ही मोहीम महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. सातारा-देवळाईसह शहरातील ज्या भागांमध्ये अद्याप नवीन योजनेतून पाणीपुरवठा सुरू झालेला नाही, अशा 'नो-नेटवर्क' भागांना नवीन वर्षात पाणी उपलब्ध करून देण्याचे
मनुष्यबळ ३०० वरून ५००
▶ पाणीपुरवठा योजनेची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या या कामासाठी ३०० कर्मचारी कार्यरत असून, ही संख्या वाढवून ५०० करण्याचे नियोजन आहे. वाढीव मनुष्यबळाच्या मदतीने वितरण वाहिन्यांची स्वच्छता, आवश्यक दुरुस्ती आणि नवीन नळजोडण्या देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
उद्दिष्ट असल्याचे आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या भागांतील रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions